
दैनिक स्थैर्य | दि. 25 मे 2025 | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांच्या प्रभाग क्रमांक ६ मधील शनिनगर बाणगंगा नदी संरक्षक भिंत बांधणे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेविका सौ. प्रगती भाऊसो कापसे यांनी दिली आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पीय नाबार्ड-२९ मधून सुमारे १ कोटी ८९ लाख ३५ हजार रुपयांच्या बाणगंगा नदीवरील दहावा घाट बॉक्स सेल पूलाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती सुद्धा माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेविका सौ. प्रगती भाऊसो कापसे यांनी दिली.