बँजो-बँड चालक व कलाकारांना परवानगी देण्याची मागणी
स्थैर्य, सातारा, दि. 7 : लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ यासह विविध शुभ कार्यक्रमांना परवानगी नसल्याने बँड-बँजो पथकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड-बँजो चालक व कलाकार संघटनेचे बँड बजाव आंदोलन केले. यावेळी शासनाने बँड-बँजो वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
सोशल डिस्टन्स पाळून केलेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदेन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, कोरोना सारख्या जागतिक महामारीने असंघटीत वर्गात मोडणारा बँड-बॅजो चालक व कलाकार आर्थिक संकटात आहेत. ज्यांच्या शिवाय कोणतेही शुभकार्य किंवा समारंभ पूर्णत्वाला जावू शकत नाही, अशा बँड-बेन्जो कलाकारावर बंधन आलेले आहे. गेली 6-7 महिने हया कलाकारांना प्रचंड आर्थिक मागला नुकसानास सामोरे जावे लागलेले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय बँड-बँजो वाजवून त्यावर संपूर्ण कुटुंब जगवणे ही गेली कित्यक वर्षाची त्यांची परंपरा कोरानामुळे थांबलेली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात 250-300 बॅन्ड-बेन्जो पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात 20-25 कलाकार काम करतात. या हिशोबाने प्रत्येक जिल्हयात 6000 ते 7000 कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. असंघटित कलाकारांना कसलेही दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. आज रोजीरोटीस महाग झालेला आहे. यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आपल्या कार्यालयासमोर बॅन्ड बजाव आंदोलन करत आहोत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बँन्ड, बेन्जो वाजवण्यावरील बंदी तात्काळ उठवण्यात येऊन किमान 10 कलाकारांना (सोशल डिस्टनिंग) वाद्य वाजवण्यास परवानगी मिळावी. कलाकारांना शासन स्तरावरून असंघटित बांधकाम कारागीरांना ज्या पध्दतीने आर्थिक मदत दिली त्याप्रमाणे आधिक मदत मिळावी. बँड-बँजो चालकांना कर्जहप्ते भागवण्यासाठी व पार्टींच्या देखभालीसाठी अडचणीच्या काळात किमान 5 लाख रुपये बिनव्याजी (परतफेडीने) मदत मिळावी. या क्षेत्राला लोककलेची मान्यता तात्काळ मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.