विंधन विहिरींवरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत शिथिल; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यात कृषी पंपांच्या विंधन विहिरी खोदण्यावर लागू असलेली बंदी आगामी १५ डिसेंबरपर्यंत शिथिल करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०९ नोव्हेंबर : शेतीसाठी जलसाठे वाढवणे आणि सिंचन सुविधा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, विंधन विहिरींवरील बंदी काही कालावधीसाठी शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ऐन रब्बी हंगामात पिकांना पाणी देणे सोपे होणार असून शेतकऱ्यांमधील चिंतेचे वातावरण दूर झाले आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीला यश

राज्यात भूजल पातळी खालावल्याने आणि पाणीटंचाईच्या शक्यतेमुळे विंधन विहिरींवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, शेतकरी वर्गाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण मागण्यांचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही सवलत दिली आहे. यामुळे रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!