दैनिक स्थैर्य | दि. ०७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्या मतदारसंघातील सर्वाधिक प्रश्न विचारणारे आमदार म्हणून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांचेच नाव आघाडीवर येत असते. गत १५ वर्षांपासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दीपक चव्हाण हे प्रतिनिधित्व करीत आहेत. श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतृत्वामध्ये दीपक चव्हाण यांचे कामकाज हे अतिशय उत्कृष्ट असेच आहे.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास हा दिपकराव चव्हाण यांनी घेतला आहे. त्यामुळे यंदा चौकार मारण्यासाठी पुन्हा फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने दीपक चव्हाण यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करावे; असे आवाहन श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले आहे.
फलटण तालुक्याचा जर विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत रामराजे, आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांनी त्यांच्या काळामध्ये जे काम केले आहे. ते कधीही फलटण तालुका विसरू शकणार नाही. श्रीमंत रामराजे यांनी धोम – बलकवडी हे धरण बांधून त्याच्या कालव्याचे काम सुद्धा पूर्णत्वास नेहले आहे. त्यामुळे कायम दुष्काळी तालुका म्हणून ज्या फलटण तालुक्याची ओळख होती ती सुद्धा पुसली आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात नव्याने साखर कारखाने सुद्धा उभारले गेले आहेत; असे मत सुद्धा डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना डॉ. शेंडे म्हणाले कि; श्रीराम सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आणण्याचे काम कारखानीचे तत्कालीन संचालक मंडळाच्या माध्यमातून झाले होते. त्यावर अगदी राज्यातील दिग्गज नेत्यांनी सुद्धा श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांना सदरील कारखाना हा अवसायनात काढून पुन्हा तुम्ही स्वतः विकत घेऊन खाजगी कारखाना म्हणून चालावा; असा सल्ला दिला होता.
परंतु फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा व मालकीचा कारखाना हा श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे; तोच कारखाना आम्ही अवसायनात काढू शकत नाही. आहे असा सहकारी साखर कारखाना वाचवण्याचे काम हे श्रीमंत रामराजे यांनी केले आहे. त्यांच्या ह्या कामामुळेच आज श्रीराम कारखान्याच्या शेवटच्या सभासदाचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाना सुरु राहतो.