दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण ते बारामती रस्त्याची अत्यंत दुरावस्था ही फलटण तालुक्याच्या काही भागात व बारामती तालुक्याच्या काही भागांमध्ये बघायला मिळत आहे. या भागांमध्ये छोटे-मोठे अपघात हे मी दररोजचेच बनलेले आहेत. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन यामुळे प्रवास करावा लागत आहे.
फलटणमधील सोमंथळी येथील खंडेलवाल पेट्रोलियम ते सोमंथळी गाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे बघायला मिळत आहेत. अगदी एक एक, दोन दोन फुटाचे खड्डे सुद्धा या रस्त्यावरती आहेत. यासोबतच चालू असणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे ही खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
यासोबतच बारामती तालुक्यामधील सांगवी ते अगदी पाहुणेवाडी येईपर्यंत प्रत्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे झालेले आहेत. हे संपूर्ण खड्डे एवढे मोठे आहेत की, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते हेच वाहन चालकांना कळत नाही. हे खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात हे दररोजचेच झालेले आहेत. तरी याबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांसह वाहन चालक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.