

स्थैर्य, वावरहिरे, दि. ३१ (अनिल अवघडे) : बबनराव जगन्नाथ खुस्पे हे भारतीय पोस्ट खाते वावरहिरे शाखेतुन चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वरिष्ठ पोस्टमास्टर या पदावरून आज वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त वावरहिरे ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चंद्रकात दादासो वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानाचा फेटा देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबासो हुलगे, उपसरपंच तुकाराम जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदिप अवघडे, मल्हारी जाधव, विकाससेवा सोसायटीचे चेअरमन दादासो खुस्पे, अजितभाई मोदी, भगवान गुळीक, दिपकराव भोसले, गोरखनाथ अवघडेसर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

