आज काँग्रेसची आझादी गौरव यात्रा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । फलटण । अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरानव्ये व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचानानव्ये फलटण तालुका शहर काँग्रेस कमिटी द्वारे आज गुरूवार दि. ११ रोजी रोजी दुपारी १.३० वाजता भारताच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या (अमृत महोत्सव) निमित्त फलटण येथे आझादी गौरव यात्रा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, सातारा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सरचिटणीस उदयसिंह उंडाळकर, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी फलटण तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जिंती नाका स्व. यशवंतराव चव्हाण व स्व.वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मलठण, हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौक, सिमेंट रोड, रविवार पेठ, नाना पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महावीर स्थंभ, उमाजी नाईक चौक, महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, मारवाड पेठ, नेहरू पुतळा येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

तरी फलटण तालुक्यातील नागरिकांनी पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!