
दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। फलटण । येथील मुधोजी हायस्कूल मधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी आयुष गणेश शिरतोडे याने नवी दिल्ली येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटातील स्टेअर्स नॅशनल लेवल अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 400 मीटर धावणे यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल मिळवले. आयुष शिरतोडे याला तायाप्पा शेंडगे, राज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.