दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२३ । सातारा । जिल्हा माहिती कार्यालय, सातारच्या वतीने जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध विभागांच्या शासकीय योजनांविषयी लोक कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद, महिला व बाल कल्याण, कृषि यासह विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमामध्ये त्रिरत्न सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, आधार सामाजिक विकास संस्था व विरंगुळा महिला सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था या कलापथकांनी शाहिरी, पथनाट्य, पोवाडा या माध्यमातून लोकांना समजेल अशा पद्धतीने योजनांविषयी जिल्ह्यातील 34 गावांमध्ये जनजागृती केली.