दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । सातारा । प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मनोरुग्ण व्यक्तींकरिता व ॲसिड हल्ल्यांच्या पिडीतांना विधी सेवा योजना 2015 जागरुकता शिबीराचे जिल्हा न्यायालयात व यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची मनोरुग्ण आणि मानसिक दिव्यांग व्यक्तीकरिता योजना 2015 या विषयी दिवाणी न्यायाधीश क. स्तर एम.बी. पठाण यांनी माहिती दिली. तर ॲङ जान्हवी जोशी यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची ॲसिड हल्ल्यांच्या पिडीतांना विधी सेवा योजना 2015 विषयी सविस्तर माहिती दिली.
जागरुकता शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.