दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । सातारा । फेम सोशल सोसायटी तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा कै. माणिक शंकर लोखंडे सेवाभावी स्मृती पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा पुरस्कार सातारच्या इंदु कारळे (इंदु आज्जी) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया नागरिकांसाठी देण्यात येतो.
त्यामुळे यंदाचा हा पुरस्कार इंदु आज्जींची सामाजिक सेवेची दखल घेऊन त्यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिवशी इंदु आज्जींच्या निवासस्थानी जावुन देण्यात येणार आहे. असे, संस्थेच्या अध्यक्षा सौ. वर्षा चंद्रशेखर-लोखंडे यांनी कळविले आहे.