महाराष्ट्र राज्य हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या ३ वर्षांचे साहित्यविषयक पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी ३० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन अकादमीने केले आहे. अधिक माहिती mahasahitya.org वर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. हिंदी भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी काम करत आहे.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23  या तीन वर्षांसाठी अखिल भारतीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, विधा पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकातघर, विकास विभाग इमारत, शहीद भगतसिंह मार्गमुंबई- 400001 या पत्त्यावर 30 डिसेंबर 2022 पूर्वी  संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहिती www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावरील नवीन संदेश या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल.


Back to top button
Don`t copy text!