मानवी मनाची मशागत करुन आदिशक्तीचा जागर : पोलिस निरीक्षक किरण अवचर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । बारामती । सामाजिक भान ठेऊन वाडी वस्तीवर जनजागृती करुन जय तुळजा भवानी मंडळ कार्यरत आहे. व्याख्यानमालेतून मानवी मनाची मशागत करुन आदिशक्तीचा जागर सुरु आहे. हा उपक्रम स्तृत्य आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर (पणदरे) ता. बारामती येथील शारदिय नवरात्र व्याख्यानमालेच्या शुभारंभा प्रसंगी उद्घाटक अवचर बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी विनोद कुमठेकर (महाबळेश्वर), नामदेवराव धुमाळ (पुणे) उपस्थित होते.

दररोज वाचन, योगासने यातून मानसिक व शारीरिक विकास साधला जात आहे. मंडळाने सातत्याने विविध उपक्रमातून लोकप्रबोधन सुरु आहे”. असे अवचर यांनी मत व्यक्त केले.

मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक प्रा. रवींद्र कोकरे यांनी व्याख्यानमाला ह्या सरस्वती मातेची आराधना व जागर करणारी शक्तीपिठ आहे. मन मेंदू मनगट यांचा सर्वागीण विकास यातूनच साधला जातो, असे मत व्यक्त केले.

पहिले पुष्प सुरेल भावगीतांची मैफिल स्वरसंध्या कोल्हापूर बाबा काळोखे, सुरेश भोईटे, गायिका प्रणिता यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी मंडळाचे विश्वस्त आदेश कोकरे, भानुदास कोकरे, मधुकर कोकरे, विश्वनाथ कोकरे, नितीन कोकरे, महेश झोरे, अमोल भिसे, नंदकुमार जाधव, बापूराव कोकरे पंचक्रोशीतील रसिक भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रास्तविक आबासाहेब कोकरे, सूत्रसंचलन सचिन कोकरे, आभार प्रदिप कोकरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!