स्थैर्य, सातारा, दि. 31 : दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस. तंबाखूच्या वापराच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जोखमी, धोक्याविषयी जनजागृती करुन जगाला तंबाखूमुक्त करणे याबबात जागरुकता पसरविणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय आहे. दरवर्षीप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी देखील एक थीम दिलेली आहे ती म्हणजे “तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती करिता तरुणांना तंबाखू उत्पादन उद्योगाच्या प्रभावापासून वंचित ठेवून त्यांचे संरक्षण करणे व तंबाखू वापरण्यापासून प्रतिबंधित करणे.”
ग्लोबल ॲक्ट टोबॅको सर्वे 2016-17 च्या सर्वेक्षणानुसार गुटखा व धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण हे इतर राज्यांच्या तुलनेत भारताचे कमी असले तरी ते इतरारंच्या तुलनेत जास्तच आहे. हे प्रमाण 15 % पर्यंत कमी करण्याचे यावर्षीचे शासनाचे धोरण आहे.
तंबाखू कंपन्या दरवर्षी जाहिरातींवर अब्जावधी रुपये खर्च करतात. तरुणांना टार्गेट ठेऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी ग्लॅमरस, माचो, हेतुपुरस्सर उत्तम रिसोर्सेस वापरण्यात येतात. तसेच नवनविन आकर्षक उत्पदने उदा. चेरी, बबलगम, युएसबी स्टिक, कॅन्डी यामध्ये फ्लेवर्सचा वापर करणे. पारंपारिक सिगरेटला पर्याय म्हणून कमी हानिकारक/स्वच्छ सिगरेटचे उत्पादन करणे. दरवर्षी तंबाखू सेवनाने मरण पावणाऱ्या कोटयावधी ग्राहकांची हानी भरुन काढण्याकरिता तंबाखू कंपन्या अशा प्रकारची नवीन उत्पादने, आकर्षक डिझाईन्स व जाहिरात मोहिम तरुणांसाठी प्रकर्षाने व हेतू पुरस्सर प्रलोभन दाखवतात. तंबाखू वेष्ठनावर तंबाखू हानिकारक आहे हे दर्शनीय भागावर ठळकपणे व स्पष्टपणे लोकांना कळेल अशाप्रकारे लिहीलेले नसते.
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग हा थुंकीद्वारे होत असल्यामुळे तंबाखू, गुटखा, सुपारी, पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये 1000/- दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये 3000/- दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रुपये 5000/- दंड व पाच दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहितेनुसार विविध कलमानुसार 6 महिने व 2 वर्षे शिक्षा व दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
तंबाखू उत्पादन उद्योगाच्या लबाडी व खोटेपणा यामुळे पुढची पिढी बरबाद होणे आपणास परवडणार नाही. पॉप कल्चर, घर, शाळा, सोशल मिडिया या माध्यमातील प्रभावी व्यक्तिमत्त्वे अशांना तंबाखू उद्योगाचे कुटील डावपेच उधळून लावण्यासाठी नवीन पिढी उद्युक्त् होण्यास तसेच Big Tobacco च्या खोटेपणा विरुध्द आवाज उठविण्यासाठी व तंबाखूचे सेवन न करण्यासाठी तरुणाईला सक्षम बनविणे आणि त्यांचे संरक्षण करणे असे आवाहन जागतिक आरोगय संघटनेने केले आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतग्रत जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच इतर विभागाच्या सहकार्याने लोकांमध्ये निरनिराळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
डॉ. विजया जगताप, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, सातारा