दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । मुंबई । अवनी हा पारंपारिक मासिक पाळीशी संबंधित आरोग्याचा स्टार्टअप मासिक पाळीच्या वेळी कापडाच्या सॅनिटरी पॅडसच्या वापरासंदर्भात असलेल्या गैरसमजांना नष्ट करण्याच्या दिशेने कार्यरत आहे. ह्या स्टार्टअपने मासिक पाळीशी संबंधित देखभालीच्या भारतीय पारंपारिक पद्धतींना नव्याने शोधून काढण्याचा निर्धार केला आहे. ह्या ब्रँडद्वारे योग्य संशोधन करून आणलेल्या व तपासून घेतलेल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांद्वारे पाळीच्या वेळेमध्ये महिलांच्या स्वच्छतेसाठी मदत केली जाते व ही उत्पादने विश्वसनीय भारतीय पद्धतींच्या आधारे शोधली गेली आहेत.
“अलीकडील वर्षांमध्ये नफा केंद्रित कंपन्यांनी कापडांच्या पॅडसच्या वापराबद्दल गैरसमज निर्माण केले आहेत. कापडावर आधारित पॅडस हे अस्वच्छ किंवा हानीकारक आहेत, हा केवळ गैरसमज आहे. त्याउलट स्वच्छ कापडाचे पॅडस रसायन रहित, त्वचेला अनुकूल असतात आणि त्यामुळे महिला किंवा पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. आम्ही जागरुकता निर्माण करून महिलांना अधिक व्यवहार्य उपाय देण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे पारंपारिक मासिक पाळीशी संबंधित आरोग्य स्टार्टअप असलेल्या अवनीच्या सहसंस्थापिका सौ. सुजाता पवार ह्यांनी म्हंटले.
ह्या ब्रँडच्या सध्याच्या श्रेणीमध्ये अवनी ईझीपॅडस, कॉटन बेस्ड पॅडस; अवनी सेफपॅडस, कापडावर आधारित पॅडस आणि मेन्स्ट्रुअल कप्स ह्यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने कमी कचरा निर्माण करतात, त्वचेला अनुकूल, स्वच्छता कर्मचा-यांना अनुकूल आणि संसर्ग रहित आहेत. ही उत्पादने अशा महिलांसाठी योग्य आहेत ज्यांची त्वचा संवेदनशील आहे आणि त्यांना त्यांच्या पाळीच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी सेंद्रिय उपायांची तातडीची गरज आहे.
“माझी त्वचा अतिशय संवेदनशील आहे आणि पाळीमध्ये नेहमी मला मॅनेज करणे कठीण जायचे जेव्हा दमटपणा आणि पॅडसमुळे रॅशेस व्हायचे. मी अनेक उत्पादने वापरून बघितली, परंतु त्यापैकी कोणतेच माझ्यासाठी उपयोगी पडत नव्हते. मला आश्चर्य वाटले जेव्हा अवनी सेफपॅडस ह्या कापडावर आधारित उत्पादनांनी मला आवश्यक तो आराम दिला. ते अगदी बाकी पॅडससारखेच होते, परंतु त्यामुळे कोणतेही रॅशेस झाले नाहीत, त्यांनी तसेच शोषूनही घेतले आणि ते त्वचेला अनुकूलही होते.” असे मुंबईस्थित देबोपमा सेन हिने म्हंटले.