
दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२३ । सातारा । जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 266.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या ३० टक्के इतका आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा –5.7 (269.5), जावली-मेढा – 8.8(492.9), पाटण –34.0 (497.5), कराड –11.0 (123.6), कोरेगाव –2.2 (122.7), खटाव – वडूज –1.3 ( 91.5), माण – दहिवडी –1.2 (91.5), फलटण –0.8 (67.1), खंडाळा –2.1 (93.7), वाई –6.8 (201.5), महाबळेश्वर –51.9 (1485.7) या प्रमाणे पाऊस झाला आहे.