स्थैर्य, औंध,दि २७: वडूज विभागात वीज वितरण कंपनीच्या औंध उपविभागाने बाजी मारत मागील आठ दिवसात सुमारे अडीच कोटी रुपयांची वीज बिल वसुली केली असून या वीज बील वसुलीस शेतकरी व घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत
असून वडूज विभागात औंध उपविभाग अव्वल असल्याची माहिती औंध वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुभाष घाटोळ यांनी दिली.
औंध उपविभागातील 26गावांमधील औंध,पुसेसावळी, वडगाव, गोरेगाव वांगी,उंचीठाणे, पळशी, खरशिंगे, येळीव, करांडेवाडी, गणेशवाडी, नांदोशी, त्रिमली, वडी,कळंबी, जायगाव, भोसरे, अंभेरी, कोकराळे राजाचे कुर्ले व अन्य गावांचा सहभाग चांगला असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेती पंपाचे सुमारे 10कोटी 66लाख रुपयांचे वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सुमारे दिड कोटी रुपये वसुलीचा टप्पा पार करण्यात आला आहे. मागील दोन दिवसात तब्बल एक कोटी रुपयांची वसुली शेती पंप,औद्योगिक, घरगुती ग्राहकांकडून झाली आहे.
या वसुलीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.31मार्च पर्यंत मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुल होईल अशी माहिती घाटोळ यांनी दिली. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ही वसुलीस चांंगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती देऊन खटाव, वडूज, दहिवडी व औंध या चार उपविभागात वीज बिल वसुलीमध्ये औंध उपविभाग अव्वल असल्याची माहिती त्यांनी दिली.
याकामी सहाय्यक अभियंता रुपेश लादे,ज्ञानेश्वर करे,विशाल पवार, लेखापाल एस.व्हीजाधव, सुनील इंगळे, एस.एस.जाधव ,सर्व जनमित्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.