स्थैर्य, औंध, दि. २७: मागील तेरा वर्षापासून सांगली जिल्ह्यातील फरार असलेल्या संशयित आरोपीला पकडण्यात औंध पोलीसांना यश आले असून सांगली जिल्ह्यातील तीन व सातारा जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी ,नव्या ऊर्फ नवनाथ लत्या काळे वय 38 हा संशयित आरोपी चौकीचा आंबा येथे आल्याची माहिती औंध पोलीसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. संशयित आरोपी नव्या ऊर्फ नवनाथ लत्या काळेवर सांगली जिल्ह्यातील कडेगाव, चिंचणी अंबक, आष्टा तसेच सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत तर नवनाथ काळेला पकडण्यासाठी सांगली सेशन कोर्टाचे 2008 सालापासूनचे स्टँडिग वाँरट जारी केले आहे.
त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा, खून व मारामारीचे विविध गुन्हे दाखल आहेत.याकामी सपोनि उत्तम भापकर, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, पोलीस नाईक राहुल वाघ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.