बौद्ध समाजाचा २५ ऑगस्टला महामेळावा; संवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण – कोरेगाव या २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या बौध्द समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची समाजात खंत निर्माण झाल्याने व समाजाला डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी ‘एकच निर्धार …बौद्ध आमदार’ अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे. या संवाद अभियानास मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राजकीय मोट बांधण्यासाठी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाचे आयोजन रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे करण्यात आले आहे.

विडणी, पिंपरद, आसू, गुणवरे, बरड, आंदरुड, तरडगाव, साखरवाडी, आदर्की, वाठार – निंबाळकर,राजाळे, उत्तर कोरेगाव यासह ८० हून अधिक गावात संवाद अभियानास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जो राजकीय पक्ष बौध्द समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे उभे ठामपणे राहण्याचा निर्धार ग्रामीण भागातील तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थांनी बोलून दाखविला आहे.

संवाद दौर्‍यात ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, वरिष्ठ युवा पत्रकार सचिन मोरे, शक्ती भोसले, सचिन अहिवळे, मधुकर काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, राजू मारुडा, सुधीर अहिवळे, संजय गायकवाड, नंदकुमार मोरे, बी. टी. जगताप, विकास काकडे, दत्ता अहिवळे, संग्राम अहिवळे, दया पडकर, सनी काकडे, हरीष काकडे, संदिप काकडे, उमेश कांबळे, शितल अहिवळे, शाम अहिवळे, विकी काकडे, महादेव गायकवाड, अमित भोसले, रोहित माने, सागर अहिवळे आदी मान्यवर सहभागी होते.

महामेळाव्यात शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्याचबरोबर नवोदित गायक, संगीतकार व गीतकार सागर भोसले हे आपले गाणे यावेळी सादर करणार आहेत.

महामेळाव्याचे भव्य आयोजन

बौध्द समाज बांधवांच्या महामेळाव्यात फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बौद्ध बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्याकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!