लेखापरीक्षकांचे उद्यापासून देवगडला अधिवेशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | सातारा |
राज्यातील लेखापरीक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन श्री क्षेत्र संस्थान देवगड (जि. अहमदनगर) येथे दि. २० व २१ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. या अधिवेशनास सातारा जिल्ह्यातील सर्व लेखापरीक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विवेक गायकवाड यांनी केले आहे.

अधिवेशनास राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहनिबंधक जाधव, एस. बी. पाटील, विशेष लेखापरीक्षक सदानंद वुईके, राजेंद्र निकम, अभय कटारिया व सहकार क्षेत्रातील इतर तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सन २०२३ पासून राज्यातील सहकारी पतसंस्थांना लेखापरीक्षणाचा आदर्श मसुदा लागू केला आहे. या धर्तीवर असाच मसुदा सन २०२४ पासून राज्यातील सहकारी संस्थांना लागू करण्यात येणार आहे. याविषयी व लेखापरीक्षणातील अडचणी, नवीन नियम, लेखापरीक्षकांचे प्रश्न आदींबाबत अधिवेशनात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अधिवेशनात राज्यस्तरीय ‘आदर्श लेखापरीक्षक पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!