जप्त वाहनांचा लिलाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२३ । सातारा । मोटार वाहन कर भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या 21 वाहनांचा जाहिर ई- लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे दि. 15 जून 2023 रोजी  सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आला असून        सदर वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथील आवारात व इतर ठिकाणी दि. 30 मे ते 9 जून 2023  दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध्‍ आहेत.

जाहिर ई- लिलावात एकूण 21 वाहने उपलब्ध आहेत. यात ऑटो रिक्षा -6 टुरीस्ट टॅक्सी-6 डी.व्हॅन (3W) -4 व मोटार सायकल -5 अशा वाहनांचा समावेश आहे.ई- लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहिल, याची संबंधीत वाहन मालकांनी नोंद घ्यावी.

ई- लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार सातारा, वाई,  माण, कोरेगाव, महाबळेश्‌वर, खटाव, कराड, खंडाळा, महाड, आणि जावळी  तसेच उप प्रादेशिक कार्यालय सातारा यांच्या सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहेत. इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,सातारा व इतर ठिकाणी करता येईल. जाहिर ई- लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 30 मे  ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर दि. 12 ते 13 जून 2023 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे खटला विभागात सकाळी 11 ते संध्याकाळी  5 वाजेपर्यंत नावनोंदणी  फि  रु 500/- (नापरतावा) आणि रु 1,00,000/- रक्कमेचा डी.डी. प्रत्येक एका लॉटसाठी व लिलावातील प्रत्येक एका वाहनासाठी रु 500/- प्रमाणे होणरा एकत्रित रक्कमेचा “DY RTO SATARA”या नावे अनामत रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट सह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, ॲप्रुव्हल करुन घेणेसाठी सादर करणे गरजेचे असल्याचे कराधान अधिकारी तथा उप प्राद्रेशिक अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!