हिंदूस्थान फिडस् कंपनीमधील परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मुळगावी सोडण्यासाठी सहायक कामगार आयुक्तांकडून दखल


स्थैर्य, सातारा दि. 29 : सातारा नवीन एमआयडीसीतील मे. हिंदूस्थान फिडस् मॅन्यु. लि. कंपनीमधील 109 परप्रांतीय कामगार काम करत असल्याचे निर्दशनास आले आहे. आपआपल्या गावी जाण्यासाठी हे कामगार आतूरलेले असून त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी मालकाने त्यांच्या आमच्या गावी जाण्यासाठी सोडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर प्रशासनाने दखल घेवून मे. हिंदूस्थान फिडस्  कंपनीमधील सर्व कामगारांना गावी पाठविण्याबाबत व्यवस्थापनाला सुचित केले. यानुसार येत्या दोन दिवसात कामगारांना परराज्यात पाठविण्याबाबत व्यवस्थापनाने दखल घेतेलेली आहे. एकूण कामगारांपैकी 71 कामगारांना मालकाच्या खर्चाने त्यांच्या मुळ गावापर्यंत पाठवण्याची सोय कपंनी व्यवस्थापनाने केली असून उर्वरित कामगारांना त्यांच्या स्वेच्छेने कंपनीत काम करण्यासाठी थांबलेले आहे. राहिलेल्या कामगारांची जेवणाची व राहण्याची सर्व सोय व्यवस्थापन करीत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने लेखी कळविले असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त सातारा यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!