दैनिक स्थैर्य । दि. २७ जानेवारी २०२३ । फलटण । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुल येथे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात राजे गट कार्यरत आहे. ना. गडकरी यांच्या जाहीर कार्यक्रमात राजे गटाचे विविध कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याने उपस्थित नागरिकांच्या भुवया उंचावत आहेत. यामुळे कार्यक्रम स्थळी विविध चर्चांना उधाण आले आहे.
कार्यक्रम सुरू होण्यास काही अवधी राहिला असताना राजे गटाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसत आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत यापूर्वी सुद्धा विविध तर्क लावले जात होते. काही वेळा तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत स्पष्टता केली होती. परंतु आज पुन्हा राजे गटाचे कार्यकर्ते ना. गडकरी यांच्या कार्यक्रमाला दिसल्याने विविध चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
ना. नितीन गडकरी व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची आज भेट होणार असल्याची चर्चा सुद्धा गेले काही दिवस फलटणमध्ये सुरू आहे. याच प्राश्वभूमीवर राजे गटाचे आजी माजी पदाधिकारी हे ना. गडकरी यांच्या कार्यक्रमात दिसत असल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.