महाबळेश्वर येथील महिलेवर अत्याचार, शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि. ३१: महाबळेश्वर येथील एका विवाहित महिलेवर सातारा, पोलादपूर, चिपळूण येथे वारंवार अत्याचार करुन त्याचे चित्रीकरण करत ‘तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर जीवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. सलीम लियाकत मुजावर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित महिला महाबळेेश्वर परिसरात राहत असलीतरी काही दिवस ती सातारा येथे राहत होती. याचवेळी तिची आणि सलीम लियाकत मुजावर (वय ३0, रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा) याची ओळख झाली. या ओळखीनंतर सलीमने संबंधित महिलेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत त्याचे मोबाईलवर फोटो काढून चित्रीकरणही केले. यानंतर सलीमने हे फोटो आणि चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ‘तू जर माझ्याशी लग्न नाही केलेस तर हे चित्रीकरण, फोटो तुझे सासू, सासरा, पीत, आई, वडील आदींना दाखविणार,’ असल्याचीही धमकी दिली. यास नकार देताच सलीमने संबंधित महिलेवर मंगळवार पेठेतील खारी विहिर, पोलादपूर, चिपळूण येथे वारंवार अत्याचार केला. हा संपूर्ण प्रकार ऑक्टोबर २0२0 ते दि. २३ नोव्हेंबर २0२0 या कालावधीत वेळोवळी घडला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित पीडित महिलेने सलीमच्या विरोधात दि. २८ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!