आटपाडी प्रथमच सीसीटीव्ही बसणार – वृषाली पाटील; सरपंच


दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । आटपाडी ।  आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होण्यासाठी जिल्हा नियोजन कमिटीतुन आटपाडी शहरातील प्रमुख रस्ते व चौक साई मंदिर चौक, एसटी स्टँड परिसर, कल्लेश्वर मंदिर, बाजारतळ, शेटफळे चौक, सांगोला चौक, ग्रामपंचायत चौक, थिएटर चौक, आण्णा भाऊ साठे चौक, जाधव महाराज रोड परिसर, कोर्ट परिसर, मार्केट कमिटी, आबानगर चौक, ग्रामीण रुग्णालय चौक, मुढेवाडी रोड ढोले मिस्त्री चौक या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मंजूर होऊन प्रत्यक्ष सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कामही प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या शिवाय इतर ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे असल्यास संबंधित नागरिकांच्या सहभागातून बसविण्यात येतील, संबंधित नागरिकांनी पोलिस स्टेशनशी अगर सरपंच यांच्याशी संपर्क साधावा. सीसीटीव्ही कॅमेरे चे सर्व मशिनरी व डिस्प्ले आटपाडी पोलीस स्टेशन ला असणार असुन होणाऱ्या सर्व हालचालीवर आटपाडी पोलीसांचे बारीक लक्ष असणार आहे, त्यामुळे शहरातील चोर्‍या व इतर गुन्हे बंद होतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे हि विनंतीसौ.वृषाली धनंजय पाटील.


Back to top button
Don`t copy text!