महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीत एटीएम दोन महिन्यांपासून बंद; ग्राहकांसह पर्यटकांची गैरसोय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, भिलार, दि.५: पाचगणी (ता. महाबळेश्वर) या पर्यटनस्थळांवर असणारे स्टेट बॅंकेचे एटीएम हे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. ऐन पर्यटन हंगामात हे एटीएम बंद असल्याने ग्राहक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे हे सेंटर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.

ढिसाळ सेवेमुळे ग्राहक नाराज 
स्टेट बॅंकेत दोनच कर्मचारी असल्याने या बॅंकेत व्यवहार करताना ग्राहकांना ताटकळत बसावे लागते, तर किरकोळ कामालाही तासभर लागत आहे. चेक व्यवस्थेची तर बोंबाबोंब आहे. खात्यावर भरलेला चेक वाटण्यासाठी आठवडा उलटला तरी प्रक्रिया होत नाही, या ढिसाळ सेवेमुळे ग्राहक नाराज आहेत.

Back to top button
Don`t copy text!