सद्यस्थितीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, उपरुग्णालय, कोरोना केअर सेंटर मध्ये 3 हजार 523 बेड्स

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १४: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोविड बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने जिल्हृयात  एकूण 3 हजार 523 बेड्स आहेत.  यापैकी  जिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 128 बेड असून त्यापैकी 95 बेड व्हेंटेलेटरचे व 164 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 728 ऑक्सिजनचे व 141 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 528 बेड असून त्यापैकी 109 बेड व्हेंटेलेटरचे आहेत व 134 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 1010 ऑक्सिजनचे व 275 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 867 बेड आहेत. असे एकूण  204 व्हेंटेलेटर बेड, 298 व्हेंटेलेटरशिवाय बेड, 1738 ऑक्सिजनचे व 1283 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. ही जिल्ह्यातील बेडची सद्य स्थिती आहे. ही संख्या उपलब्धतेची नाही.


Back to top button
Don`t copy text!