
दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील ललगुण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४ -२५ कार्यक्रमाअंतर्गत ‘बीजामृत कसे बनवावे व त्याचे फायदे’ या विषयावर प्रशिक्षण दिले. यावेळी आवश्यक साहित्य, बीजामृत बनविण्याची शास्त्रीय पद्धत तसेच बीजामृताचे उपयोग समजावून सांगितले.
बीजामृत हे एक पारंपरिक जैविक बीजसंस्कार असून यामुळे पिकांची होणारी वाढ निरोगी होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती, सहनशीलता वाढते. शेतामधील मातीतील चांगल्या बॅक्टेरियांची उपज वाढवायला याचा उपयोग होतो. तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते, असे अनेक फायदे कृषीदुतांनी स्पष्ट केले.
यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.