कराड येथे महिलेला गंडा घालून सहा लाख रुपयांचे दागिने लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑगस्ट २०२२ । कराड । कराड येथून अज्ञात सरटेंनी हातच्यालाकी करून सहा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करत महिलेला गंडा घातल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुभद्रा रोकडे स्वामी समर्थांच्या भक्त आहेत. त्यांच्या घरी महाप्रसादही होत असते. त्याची माहिती शहरातील बहुतांशी लोकांना आहे. त्याचाच फायदा घेत आज दुपारी त्यांच्या घरात अनोळखी व्यक्ती आली. त्यावेळी सुभद्रा रोकडे घरात एकट्याच होत्या. ती संधी साधून मला तुमच्या स्वामींचा आर्शिवाद घ्यायचा आहे. घरातील देवाचे दर्शन घ्यायचे आहे. तुमच्या देवाच्या दर्शनामुळे माझेही भले होईल, असे सांगत तो भामटा घरातच शिरला. घरातील देवघरात तो देवाच्याही पाया पडला. तेथे एक हजार रूपये ठेवले. त्यावेळी माझा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे, असे म्हणत तुमचे दागिने द्या, ते माझ्या दागिन्यांना लावा. म्हणजे माझ्याही धंद्यात वाढ येईल, असे म्हणत त्यांने त्या महिलेचे दागिने रूमालात बांधून तेथेच जवळ ठेवले. त्याचवेळी त्यांच्या घराची कडी वाजली. कोण आले आहे, हे बघण्यासाठी त्या बाहेर गेल्या. त्यावेळी दारावरील माणसाने मी एका कंपनीकडून आलो आहे, तुमचे आधारकार्ड दाखवा. शासनाची मोहिम आहे, असे म्हणत सुभद्रा यांच्याकडे आधारकर्डची मागणी केली. त्यांनी जरा थांबण्यास सांगून त्या व्यक्तीकडे गेल्या. त्या व्यक्तीने तोपर्यंता हातचलाखीने त्यांच्या रूमाल बदलला. दागिन्यांचा रूमाल घेवून तो पसार झाला. त्यांच्या देवघरात दुसराच रूमाल ठेवला होता. आधारकार्ड दाखवलेली व्यक्तीही निघून गेली. सुभद्रा यांनी रूमाल पाहिला. त्यावेळी त्यात 70 रूपये होते. दागिने लंपास झाले होते. त्यांच्या नातेवाईकांच्याही गी गोष्ट लक्षात येताच, त्यांनी त्वरीत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही फिर्यादीपूर्वीच भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. त्या भागातच पालिकेसह व्यापाऱ्यांनी बसवलेले सिस्टीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Back to top button
Don`t copy text!