तळागाळातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी नूतन पदाधिकारी काम करतील हि खात्री : आमदार जयकुमार गोरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोळकी : सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जाहीर केल्या असून नूतन पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्या. तर संघटनेचे काम तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांसाठी करा व भारतीय जनता पक्ष हा घरा घरात आपण सर्व जण पोहचवाल अशी खात्री असून आगामी काळामध्ये तुम्हाला लागेल ते सहकार्य आपण करू, असे आश्वासन माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना दिले.

माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची भारतीय जनता पक्षाचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट घेतली. यावेळी फलटण तालुकाध्यक्ष विष्णू लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते व माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!