सहायक कामगार आयुक्त ‘एसीबी’च्या जाळ्यात दोन लाख घेताना रंगेहाथ पकडले


स्थैर्य, सातारा, दि.७: येथील सहायक कामगार आयुक्ताला 2 लाखांची लाच घेताना सातारा ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले असून, संजय शामराव महानवर (वय 42, रा. धुमाळ निवासस्थान, संभाजीनगर, सातारा) असे संबंधित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ येथील लेबर सप्लायरकडे सहायक कामगार आयुक्त संजय महानवर याने कामगारांची नोंदणी करण्यासाठी 11 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती 8 लाख रुपये घेण्याचे मान्य करून त्यापैकी 2 दोन लाख रुपये घेताना संजय महानवर याला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई एसीबी पुण्याचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, एसीबी सातारा पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो. हवा शिंदे, पो.ना ताटे, खरात, पो.कॉ. काटकर, भोसले यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!