दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा येथील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या केस प्रकरणात पैसे मागून त्रास दिल्याप्रकरणी राजेंद्र चोरगे यांनी याबाबतचे पुरावे पोलिस अधीक्षकांना सादर केल्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के यांची पदावनती करुन त्यांना हवालदार करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तीन वर्षापूर्वी गुरुकुल शाळेच्या मालकी हक्कावरुन वाद झाला होता. यातून राजेंद्र चोरगे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची अटक टाळण्यासाठी व केसमध्ये मदत होण्यासाठी पोलिस शिर्के यांनी पैसे मागितले. या सर्व बाबी चोरगे यांनी रेकॉर्डिंग केल्या. हे सर्व पुरावे पोलिस अधीक्षकांकडे सादर करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिस खात्याअंतर्गत चौकशी झाल्यानंतर नुकतेच पोलिस शिर्के यांनी पदावनती करण्यात आली आहे.