सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी टपाली मतपत्रिकाद्वारे बजावला मतदानाचा हक्क

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ मे २०२४ | फलटण |
४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणार्‍या सचिन ढोले यांनी दिनांक १ मे २०२४ रोजी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी त्यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगामार्फत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती द्वारे मतदान टक्का वाढविण्यासाठी काम करत असतात. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान महत्त्वाचे असल्याचे सांगून मंगळवार, दि. ७ मे २०२४ रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवण्यासाठी सचिन ढोले यांनी यावेळी आवाहन केले. मतदान केल्यानंतर त्यांनी सेल्फी पॉईंटवर फोटो घेतला. यावेळी टपाली मतदान प्रक्रिया अधिकारी व कर्मचारी व स्वीप टीम सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!