
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत देण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी यांनी आपल्या दोन दिवसाच्या पगारासह ३ लाख २१ हजार १०० रुपये एवढा निधी एकत्रित करुन मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ साठी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष उल्हास इंगवले, सचिव डॉ. राम मुंडे आणि आयुक्त अरुण उन्हाळे यांनी हा धनादेश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांच्या कडे सुपूर्द केला.
