
स्थैर्य, फलटण, दि १४: अमोल रोमन यांनी गोरगरिबांसाठी सुरु केलेल्या अनमोलरत्न अॅम्ब्युलन्स सर्व्हिससाठी राजे गटाचे कार्यकर्ते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कुरवली शाखेतील कर्मचारी प्रशांत अहिवळे यांनी रुपये 10 हजाराचे आर्थिक सहकार्य धनादेशाद्वारे नुकतेच सुपुर्द केले.
अॅम्ब्युलन्सच्या टायर खरेदीसाठीच्या उद्देशाने आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने ही मदत केली असल्याचे प्रशांत अहिवळे यांनी सांगितले.
या दातृत्त्वाबद्दल प्रशांत अहिवळे यांचा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सत्कार केला असून यावेळी डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य, रहिम तांबोळी, धिरज अग्रवाल, तुषार इंगळे, आसिम तांबोळी, माऊली घोलप उपस्थित होते.