
स्थैर्य, सातारा, दि.१८: येथील गोलबाग, राजवाडा येथे पुढे जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून दुचाकीस्वारास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विकास तानाजी निकम वय 28, रा. आरेदरे, ता. सातारा आणि हणमंत राजाराम डिके वय 47, रा. सूर्या कॉम्प्लेक्स, शुक्रवार पेठ, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, दिपक श्रीरंग शिंदे रा. शुक्रवार पेठ, सातारा हे त्यांच्या ऑफिसला निघाले होते. गोलबाग येथे दोघेजण त्यांच्या गाडीच्या बाजूला आले. त्यामुळे शिंदे यांनी गाडी थांबवून त्यांना पुढे जावा असे सांगितले. त्याचा राग येवून संशयीताचे त्याची दुचाकी थांबवून शिंदे यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यात शिंदे यांच्या डोळ्याच्या भुवईखाली जखम झाली असून हातालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून विकास तानाजी निकम आणि हणमंत राजाराम डिके या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोन्ही संशयीत पसार झाले असून हवालदार गायकवाड तपास करत आहेत.