दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । मुंबई । इझमायट्रिपडॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने विपणन उपाध्यक्ष म्हणून आशुतोष शर्मा यांची नियुक्ती केली आहे. आशुतोष कंपनीच्या विपणन विभागाचे नेतृत्व करतील आणि ब्रॅण्ड दृश्यमानता वाढवतील. ते नवीन विकास संधी ओळखत आणि सर्वांगीण दृष्टीकोनासह ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल व्यासपीठांचा फायदा घेत उच्च स्पर्धात्मक ऑनलाइन टॅव्हल बाजारपेठेत इझमायट्रिपचे स्थान अधिक दृढ करण्यावर देखील लक्ष केंद्रित करतील.
आशुतोष हे जाहिरात आणि विपणन उद्योगात दशकाहून अधिक अनुभव असलेले कुशल डिजिटल विपणन तज्ञ आहेत. यापूर्वी त्यांनी डेण्टसू इंडियामध्ये डिजिटल विपणनचे वरिष्ठ संचालक म्हणून काम केले. आणि त्यापूर्वी ते हाकुहोडो इन्क.सह त्यांच्या डिजिटल सर्विसेसचे प्लानिंग डायरेक्टर म्हणून संलग्न होते.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या टीममध्ये आशुतोष यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. विविध क्षेत्रांबाबत त्यांना असलेली सखोल माहिती व ग्राहक संवाद बाजारपेठेतील आमचे स्थान अधिक दृढ करण्यास मदत करेल. आम्हाला विश्वास आहे की ते आमच्या कंपनीसाठी उल्लेखनीय आहेत आणि ब्रॅण्डच्या विकासाला अधिक चालना देतील.’’
इझमायट्रिपचे विपणन उपाध्यक्ष आशुतोष शर्मा म्हणाले, ‘‘इझमायट्रिपवर ही भूमिका साकारताना मला विशेष अभिमान वाटतो. कंपनीने आपल्या ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण ऑफरिंगसह भारतातील ऑनलाइन ट्रॅव्हलमध्ये धुमाकूळ निर्माण केला आहे. मी टीमसोबत काम करण्यास आणि कंपनीच्या विकास प्रवासात योगदान देण्यास उत्सुक आहे.’’