कोरोनाकाळात अशोकशेठ सस्ते व सलीमभाई खान यांचा गरजुंना मदतीचा हात


स्थैर्य, फलटण, दि. ०७ : सध्या कोरोनामुळे फलटण शहर हे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी घोषित केलेले आहे. त्या मुळे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. हे जाणूनच प्रसिद्ध उद्योजक अशोकशेठ सस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सलीमभाई खान यांनी फलटण शहरामधील हडको, आनंद नगर व परिसरातील गरजू नागरिकांना किराणा किट्स व भाजीपाला किट्सचे वाटप केले. त्यांच्या सदरील उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी दोघांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!