गजानन ऑटोमोबाइल्सच्यावतीने अशोक लेलँड ’साथी’ मॉडेलच्या विक्रीचा शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। फलटण । सातारा जिल्ह्याचे अशोक लेलैंड मालवाहतूक वाहनाचे अधिकृत विक्रेते गजानन ऑटोमोबाईल्स प्रा. लि. यांच्यावतीने मंगळवार दि. 18 मार्च फलटण शहरात एलव्हीसी गटातील 1 टनांमधील साथी या मॉडेलचा विक्री शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. सुरुवातीला साथी या गाडीची फलटण शहरातून मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, अशोक लेलँड कंपनीचे रिजनल मॅनेजर आशुतोष कुमार, एरिया मॅनेजर वैभव तनेजा, गजानन ऑटोमोबाईल्स प्रा.लि.चे संचालक प्रवीण शेळके तसेच इतर मान्यवर, ग्राहक उपस्थित होते.

साथी गाडीचा पे लोड 1120 किलो एवढा असून गाडीचा हौदा 8.2 फूट बाय 5.3 फूल (2500 एमएम बाय 1620 एमएम) लोंडिंग एरिया 4.1स्वे. मी. आहे. साथी गाडीचे इंजन 45 एचपी पॉवरचे असून त्याचा टॉर्क 110 एनएम आहे. साथी गाडीला प्रशस्त केबिन दिले असून गाडीचे टायर 165, 214 असे आहेत. सदर कार्यक्रमात गाडीच्या या सर्व वैशिष्ट्यांची माहिती संचालक प्रवीण शेळके यांनी ग्राहकांना सांगितली.

साथी हे मॉडेल मालवाहतूक या क्षेत्रातील सर्वोत्तम कॅपॅसिटी असणारे वाहन आहे, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी व ग्राहकांनी आपली पसंती दर्शवली. या विक्री शुभारंभ सोहळ्यामध्येच चार साथी गाडीचे बुकिंग झाले. व एका गाड्यांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कंपनीकडून सर्व इच्छुक ग्राहकांसाठी विशेष सवलतीमध्ये फक्त रु.7,11,000/- एवढ्या माफक व अल्पदरात साथी गाडी खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. साथी गाडी खरेदी करण्यासाठी 100% पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

तरी सातारा जिल्ह्यातील सर्व इच्छुक ग्राहकांनी आपल्या जवळच्या अशोक लेलँडच्या शोरूममध्ये सदर गाडी पाहण्यासाठी किवा टेस्ट ड्राइव्ह घेण्यासाठी आवश्यक भेट द्यावी, असे आवाहन प्रवीण शेळके यांनी केले आहे. गजानन ग्रुपचे जनरल मॅनेजर धनंजय अवसरे यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी मोबा. 9673004003 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!