दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । बारामती । पोहणे,सायकलिंग आणि धावणे हे तिन्ही खेळ ठराविक वेळेत पूर्ण करून आर्यमॅन स्पर्धा पूर्ण होते या जनजागृती मुळे आता ग्रामीण भागात सुद्धा ‘आर्यमॅन’ होण्याची क्रेझ वाढत आहे.
बारामती मधून तरुणाचा ग्रुप आता आर्यमॅन साठी सराव करीत आहे ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर पोहणे आणि धावणे ४२ किलोमीटर असा सराव दर महिन्याला केला जातोय व दररोज वेगवेळ्या प्रकारे प्रशिक्षक मार्गदर्शक च्या सूचनेनुसार सराव बरोबर विविध व्यायाम केला जातो या मध्ये अवधुत शिंदे ,विपुल पटेल, डॉ. पांडुरंग गावडे ,ओम सावळेपाटील, राजेंद्र ठवरे, दिग्विजय सावंत,डॉ. सौरभ दोशी, युसूफ कायमखानी,डॉ. वरद देवकाते,श्री गवंड , भाऊसाहेब कारंडे यांचा समावेश असून धावणे आणि सायकलिंग साठी कोल्हापूरहुन पंकज रावळू प्रशिक्षक आहेत, तसेच निष्णात आहार तज्ञ यांचे मार्गदर्शन करतात तर पोहणे साठी प्रशिक्षक महादेव तावरे आणि सुभाष बर्गे मार्गदर्शन करत आहेत.
नुकताच या भविष्यातील आर्यमॅन खेळाडू चा बारामती मध्ये सन्मान करण्यात आला या वेळी उद्योजक सुधीर शिंदे,ललित पटेल व इतर मान्यवर उपस्तीत होते. डॉ. पांडुरंग गावडे यांनी दक्षिण आफ्रिका येथे रविवार ०३ एप्रिल रोजी आर्यमॅन स्पर्धा पूर्ण केली. वैदकीय व्यवसाय असून सुद्धा व वयाची चाळीशी पार केलेली असताना सुद्धा फक्त ३ महिन्यात सराव करून सदर स्पर्धा पूर्ण केली आहे.
आर्यमॅन स्पर्धा भारतात व परदेशात सुद्धा असतात, कमी खर्च असतो,सायकल व इतर साहित्य सहज उपलब्ध होते ,फक्त कसून सराव हाच यामधील यशाचा कानमंत्र आहे. ग्रामीण भागातील खेळाडू मुळातच कणखर व चिवट असल्याने सहज स्पर्धा पूर्ण करू शकतात. असे मत विपुल पटेल आर्यमॅन स्पर्धक यांनी सांगितले.