दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । बहुजन शिक्षक संघाच्या वतीने उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार फलटण तालुक्यातील श्री.अरविंद विश्वनाथ निकाळजवे(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहिते वस्ती) व सौ.प्रज्ञा अनंत काकडे(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळकी यांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन मा.शिक्षणाधिकारी श्री.धनंजय चोपडे व इतिहास अभ्यासक व संशोधक मा.श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यामध्ये या दोघांनी विशेष योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करून घेण्यापासून ते विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं त्यांची तयारी करून घेणं यामध्ये यांचा हातखंडा आहे.शैक्षणिक कामांबरोबरच समाजप्रबोधनाच्या कामामध्ये अग्रेसर असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना बहुजन शिक्षक संघाच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल बहुजन शिक्षक संघ, भारतीय बौद्ध महासभा,प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, आदर्श बहुजन शिक्षक संघ,मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.