स्थैर्य, फलटण, दि.१९ : पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या घराला वैचारीक वारसा आहे. क्रांतीअग्रणी जे. डी. बापू लाड यांचे ते चिरंजीव आहेत. वैचारिक परंपरा असलेल्या घरातील अरुण लाड यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत रहावे असे आवाहन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पदवीधर संवाद मेळाव्यात’ ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण लाड, महानंदचे उपाध्यक्ष डि. के. पवार, नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, काँग्रेसचे युवा नेते नगरसेवक सचिन सूर्यवंशी-बेडके आदींची यावेळी उपस्थिती होती.
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबरोबरीने पत्री सरकारमध्ये काम करणारे क्रांती अग्रणी जे डी बापू लाड यांचे चिरंजीव अरुण लाड यांच्या कुटूंबाची पार्श्वभूमी व वैचारिक परंपरा मोठी आहे. विधान परिषदेत वैचारिकतेने काम करणारा आमदार असायला हवा या साठी अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी कार्यरत रहाणे आवश्यक आहे असे श्रीमंत रामराजे यांनी या वेळी सांगितले. पुर्वी या निवडणूकीत ठराविक पक्षाचे वर्चस्व होते. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. फलटण शहर व तालुक्यात मिळून सुमारे नऊ हजार मतदान आहे. संजीवराजे यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदार मोठ्या संखेने आहेत. जे मतदार बाहेर आहेत त्यांच्याकडून मतदान करुन घ्यावे लागणार आहे. या निवडणूकीत लाड यांना मतदान करुन घेण्यासाठी नियोजनपुर्वक यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी गाफिल राहून चालणार नाही. सदर निवडणूकीचे महत्व माझ्या दृष्टीने वेगळे आहे. संपुर्ण सातारा जिल्हा व तालुक्यावर माझे पुर्ण लक्ष राहणार असून आळशीपणा व बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही रामराजे यांनी या वेळी दिला.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील म्हणाले की, पुणे पदवीधर मतदारसंघाचा काही निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते. परंतु मागील निवडणुकीमध्ये सारंग श्रीनिवास पाटील यांनी चांगली लढत देऊन भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांना प्रथम क्रमांकाचे पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आपल्या सर्वांच्या वर आहे व फलटण तालुक्यातील सुमारे 90 टक्क्यांच्या वर मतदान हे अरुण लाड यांना होईल अशी मला खात्री आहे.
यावेळी बोलताना विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, अरुण लाड महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून त्यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन आपल्याला निवडून आणायचे आहे. फलटण तालुक्यामधील असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत व त्यात सभागृहामध्ये आपल्याला पुणे पदवीधर मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अरुण लाड यांना निवडून द्यायचे आहे. तरी फलटण तालुक्यांमधून अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी जो कार्यकर्ता कष्ट करेल त्या कार्यकर्त्याला आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते सन्मान करण्याचे योजिले आहे. तरी अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत.
या वेळी बोलताना आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, १ डिसेंबरला होणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघामधून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व महाविकास आघाडी तर्फे अरुण लाड हे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. तरी त्यांना फलटण तालुक्यामधून पहिल्या पसंतीचे मत देणे गरजेचे आहे व फलटण तालुका पहिल्या पसंतीचे मत देण्यामध्ये मागे राहणार नाही अशी खात्रीही आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.
डॉ. सुमेध मगर यांना युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे विशेष अभ्यास शाखेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले की, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निमित्ताने एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे पहिली निवडणूक ही विधानपरिषदेची लढवली जात असून आगामी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघामध्ये सातारा जिल्ह्यामधून सुमारे 60 हजार पदवीधरांची नोंदणी झालेली आहे. मागील पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत थोड्या मतांनी आपला उमेदवार पराभूत झालेल्या होता. तरी या होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांना पहिल्या पंसतीचे मत देऊन त्यांना विजयी करावे व ज्या सभागृहाचे नेतृत्व फलटण तालुक्याचे व आमचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर करत आहेत. त्याच सभागृहांमध्ये अरुण लाड यांना निवडून देण्याचे काम फलटणकरांना करावे, असेही माने यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, पुणे पदवीधर मतदारसंघाचे निवडणुकीचे मतदान दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर हे जिल्हे पुणे पदवीधर मतदार संघामध्ये येत आहेत. मागील वेळेस अत्यंत कमी मताने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु ह्या वेळेस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणून लाड यांना निवडून आणण्याचे काम आपल्यावर आहे. तरी प्रत्येक गावातील पदवीधरांचा पोहण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांनी करावे व त्यासाठी लागणारी यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करू असे ही संजीवराजे यांनी स्पष्ट केले.