विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलताना व्यासपीठावर मान्यवर |
स्थैर्य, फलटण दि.२५ : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांना वैचारीक पार्श्वभूमी आहे तसेच शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगावकर हे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन सातारा जिल्ह्याचा वैचारिक वारसा जपावा असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
विधान परिषद पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांच्या प्रचारार्थ यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण येथे आयोजित पदवीधर व शिक्षक मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण, गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आ. दीपकराव चव्हाण, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, अच्युतराव खलाटे, रणजितसिंह देशमुख, अजित पाटील चिखलीकर, डॉ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील, रणजित लाड, अमरदीप लाड, मनोहर शिंदे, काँग्रेसचे युवा नेते नगरसेवक सचिन सूर्यवंशी बेडके, महेंद्र सुर्यवंशी बेडके यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यासह महाविकास आघाडतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही मतदार संघातील मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करताना श्रीमंत रामराजे, आ. पृथ्वीराज बाबा चव्हाण, ना. सतेज उर्फ बंटी पाटील, सचिन सुर्यवंशी बेडके, सुभाषराव शिंदे वगैरे |
पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदान सावधपणे, विचाराने व कष्टाने बाहेर काढावे लागणार आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील यापूर्वीच्या निवडणूकीत ठराविक एका पक्षाचे वर्चस्व होते मात्र सध्या ती परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. फलटण तालुक्यात पदवीधरांचे सुमारे 9 हजार मतदान असून शिक्षकांचे मतदानही मोठे आहे. मतदार संघात किंवा मतदान करताना 30 टक्केच्यावर मतदानाची आकडेवारी जात नाही. फलटण तालुक्यातील जे मतदार बाहेर आहेत त्यांच्याकडून मतदान करुन घ्यावे लागणार आहे. अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांना मतदान करावे यासाठी सर्वांनी एकविचाराने प्रयत्न करण्याचा निर्णय झाल्याने त्यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरु असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
अरविंद रावसाहेब भोईटे यांचे निधन
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष महाविकास आघाडीने गांभीर्याने घेतली आहे. दरवेळी येथे भाजपाचे उमेदवार निवडून येतात व मोठे नेते म्हणून मिरवतात, मात्र आता महाविकास आघाडीने मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र येवून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून 5 ही जागा आपण निश्चित जिंकू. पुणे पदवीधर मतदार संघातील अरुण लाड व पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण यांनी केले.
आ. पृथ्वीराज बाबा चव्हाण बोलताना व्यासपीठावर मान्यवर |
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ही पहिली निवडणूक असून सदरची निवडणूक पर्यायाने विचारांची निवडणूक आहे. सातारा जिल्ह्याने स्व. यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचारांचा वारसा महाराष्ट्र राज्य व देशाला दिला, मात्र आता या विचारांना देशात धोका निर्माण होवू लागला आहे. राज्य घटना, लोकशाही संपविण्याचा विचार सुरु असून हुकुमशाही प्रयत्न सुरु आहेत. देशात व राज्यात सीबीआय, ईडी वगैरे संस्थांचा दुरुपयोग करुन विचारांचा जीव/प्राण काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. धर्मावर आधारीत राजकारण पुढे आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पृथ्वीराज (बाबा) चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
मुंबई 26/11 : मरण जवळून पाहिलं की जगण्यातलं भयही निघून जातं : विश्वास नांगरे पाटील
सर्वसामान्य पदवीधर व शिक्षक यांचे मागील प्रतिनिधींनी कोणतेही प्रश्न न सोडविता वार्यावर सोडले आणि बेरोजगारी वाढविली. दोन्हीही घटकांना न्याय दिला गेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपत्र महाविकास आघाडी उमेदवारांना मतदान करुन निवडून द्यावे. कोल्हापूर जिल्ह्यातून 80 ते 90 टक्के मतदान देणार असून असा मतांचा वणवा पुणे पयर्र्त जावा अशी अपेक्षा व्यक्त करीत महाविकास आघाडी प्रश्न मार्गी लावणार हे निश्चित आहे. मागच्यावेळेसारखी बेरोजगारी वाढू न देता पवित्र पोर्टल होवू देणार नाही हे निश्चित असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
ना. सतेज उर्फ बंटी पाटील बोलताना व्यासपीठावर मान्यवर |
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून पदवीधर व शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघातील उमेदवार म्हणून अरुण लाड व पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करावे असे आवाहन रणजित लाड यांनी केले.
दि. 1 डिसेंबर रोजी पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघातील अधिकृत उमेदवार म्हणून अरुण लाड व पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत दिनकर आसगावकर निवडणूक लढवित असून त्यांना फलटण तालुक्यामधून पहिल्या पसंतीचे मत देवून परिवर्तन करावे असे आवाहन आ. दीपक चव्हाण यांनी केले.
पहिल्या पसंतीचे मत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघातील उमेदवार म्हणून अरुण लाड व पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांना देवून विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे विकास नाळे यांनी केले.
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मॅराडोनाचे हृदयविकाराने निधन
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदारांनी काहीही काम केले नाही. गेली अनेक वर्षे हा मतदार संघ विरोधकांकडे आहे. यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघातील उमेदवार म्हणून अरुण लाड व पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन विजयी करावे असे आवाहन नगरसेवक व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन सुर्यवंशी बेडके यांनी प्रास्तविकामध्ये केले. त्यापूर्वी त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
मेळाव्यास फलटण शहर व तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, समारोप व आभार प्रदर्शन तगारे यांनी केले.
त्यांना धर्मावर अधारित असलेली हुकूमशाही देशात आणायची आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
या सभेत प्रारंभी माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 36 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.