दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । मुंबई । भारताबाहेरील जगात आघाडीवर असलेली एआय आणि रोबोटिक्स इनोव्हेशन इकोसिस्टिम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत, बंगळुरू येथील ना-नफा संघटन, एआय अँड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क (आर्टपार्क) ने भारतात इनोव्हेशन प्रोग्राम सुरु केला आहे. आर्टपार्क इनोव्हेशन प्रोग्राम हा मुख्यत: कंपनीच्या उद्दिष्टाशी निगडित आहे. नवी उत्पादने आणि सेवांमध्ये एआय आणि रोबोटिक आधारीत तंत्रज्ञान आविष्कार आणि ट्रान्सलेशन्सना प्रोत्साहन केणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. स्टार्टअपना नवी आव्हाने आणि जोखीम पत्करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर फंडाद्वारे मदत केली जाईल.
जगातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन आधारीत आविष्कार आणि त्यांचे उत्पादन व कंपन्यांमध्ये रुपांतर यांदरम्यानचा ‘ट्रान्सलेशन गॅप’ भरून काढण्याचा उद्देश या प्रोग्राममागे आहे. या विद्यापीठांमध्ये अनेक इन्क्युबेटर सेट केलेले आहेत. मात्र अजूनही चांगल्या शैक्षणिक संशोधनाचे रुपांतर भविष्यातील मार्केट रेडी उत्पादने आणि सेवांमध्ये पद्धतशीरपणे करण्यास मदत होईल, अशा सुसंगत आणि धोरणात्मक योजनांचा अभाव दिसून येतो. या फरक भरून काढण्यासाठी आर्टपार्क इनोव्हेशन प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.
आर्टपार्क इनोव्हेशन प्रोग्रामद्वारे कल्पनांचे पोषण होईल, जेणेकरून तंत्रज्ञान निर्माण करण्यास मदत होईल. तसेच ज्या कंपन्यांकडे बाजारपेठ, उत्पादनांचे डिझाइन आणि विक्री कौशल्य आहे, अशा कंपन्यांना बाह्य सह संस्थापक मिळतील. तसेच या कंपन्या सुरुवातीला त्यांच्यासाठी बीज गुंतवणूकदेखील करू शकतील.
आर्टपार्कचे सह संस्थापक आणि सीआओ, सुभाषिस बॅनर्जी म्हणाले, “भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिंमध्ये तंत्रज्ञानआधारीत आर्थिक वृद्धी आणि नूतनाविष्कारांसाठी हा इनोव्हेशन प्रोग्राम सुरु केला आहे. जेणेकरून आत्मनिर्भर भारत चे उद्दिष्ट साधण्यास मदत होईल. आर्टपार्क इनोव्हेशन प्रोग्रामच्या पहिल्या बॅचमध्ये आम्ही आधीच सहा कंपन्यांची निवड केली आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करत असून जेणेकरून भविष्यातील सखोल तंत्रज्ञानातील युनिकॉर्न म्हणून भारताबाहेर ख्याती मिळवतील. आम्ही जागतिक पातळीवरील जोडलेली गुंतवणूक समिती आहोत, जी भारतातील तसेच जागतिक बाजारात स्पर्धेतील कंपन्या निवडते आणि त्यांना मदत करते.”
एआयपी अंतर्गत, चार प्रमुख प्रोग्राम तयार करण्यात आले आहेत. त्यात आर्टपार्क-स्पार्क, आर्टपार्क-इग्नाइट, आर्टपार्क-टर्बो आणि आर्टपार्क बूस्टचा समावेश आहे. या ना-नफा संस्थेचा इनोव्हेशन प्रोग्राम, प्रत्येक श्रेणीतील कंपन्यांच्या वृद्धीचा गरजांनुसार स्टार्टअपची निवड करतो आणि जागतिक स्तरावर वृद्धीकरिता त्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.