
दैनिक स्थैर्य । फलटण । येथील बाजार समितीत विविध धान्यांची आवक झाली असून येथील घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे.
बाजार समितीत ज्वारीची 137 क्विंटल ज्वारीची आवक झाली. ज्वारीला किमान 2 हजार 300 रुपये क्विंटल तर, कमाल 3 हजार 200 रुपये क्विंटल दर मिळाला. बाजरीची 331 क्विंटल आवक झाली. बाजरीला किमान 2 हजार 200 रुपये क्विंटल तर कमाल 3 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. गव्हाची 393 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2 हजार 200 रुपये क्विंटल तर किमान 2 हजार 750 रुपये क्विंटल दर मिळाला. हरभर्याची 100 क्विंटल आवक झाली. हरभर्याला किमान 5 हजार 250 रुपये तर कमाल 5 हजार 750 रुपये क्विंटल दर मिळाला. मक्याची 170 क्विंटल आवक झाली. मक्याला किमान 1 हजार 800 रुपये क्विंटल तर कमाल 2 हजार 222 रुपये क्विंटल दर मिळाला. घेवड्याची 100 क्विंटल आवक झाली. घेवड्याला किमान 5 हजार 300 रुपये क्विंटल तर कमाल 7 हजार रुपये क्विंटल दर मिळाला. मुगाची 10 क्विंटल आवक झाली. मुगाला किमान 5 हजार 200 रुपये क्विंटल तर कमाल 8 हजार 100 रुपये दर मिळाला. उडदाची 2 क्विंटल आवक झाली. उडदाला किमान 6 हजार 250 रुपये क्विंटल दर कमाल 6 हजार 250 रुपये क्विंटल दर मिळाला.

