
दैनिक स्थैर्य । 5 जून 2025। फलटण । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध धान्याची आवक झाली.
या धान्याचा घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे – ज्वारी – किमान 2 हजार 200 रुपये, कमाल 3 हजार 52 रुपये दर मिळाला. ज्वारीची 250 क्विंटल आवक झाली. बाजरी- किमान 2 हजार ते कमाल 3 हजार रुपये दर मिळाला.
बाजरीची 300 क्विंटल आवक झाली. गहू – किमान 2 हजार 300 ते कमाल 2 हजार 800 रुपये दर मिळाला. गव्हाची 674 क्विंटल आवक झाली. हरभरा – किमान 5 हजार 250 ते कमाल 5 हजार 800 रुपये दर मिळाला. हरभर्याची 204 क्विंटल आवक झाली.
मका – किमान 2 हजार 150 ते कमाल 2 हजार 250 रुपये दर मिळाला. मक्याची 204 क्विंटल आवक झाली. खपली – किमान 4 हजार 611 ते कमाल 4 हजार 611 रुपये दर मिळाला. खपलीची 5 क्विंटल आवक झाली.
घेवडा – किमान 4 हजार 500 ते कमाल 6 हजार रुपये दर मिळाला. घेवड्याची 70 क्विंटल आवक झाली.
मुग – किमान 6 हजार ते कमाल 7 हजार 500 दर मिळाला. मुगाची 10 क्विंटल आवक झाली.

