दैनिक स्थैर्य | दि. १६ जून २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील राजापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एजुकेशन सोसायटी संचालित कृषि महाविद्यालय फलटण येथील कृषिदूतांचे गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी व तरुण कार्यकर्ते यांच्याद्वारे गावात स्वागत करण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या अभ्यासकाप्रमाणे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम-२०२४-२५ साठी कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या कृषिदूतांचे राजापूर गावात सरपंच, तलाठी व ग्रामस्थ यांच्याद्वारे स्वागत करण्यात आले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत व प्रा. संजय अडत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कृषिदूत अर्थव देवकर, यश निकम, सत्यजित धायगुडे, रोहन बारबोले, पुष्कर बिसेन, सुयोग भोसले, साहिल भोसले यांचे सरपंच वनित हिरालाल पवार, माजी सरपंच हनुमंत धनवट (गुरुजी), तलाठी उत्कर्ष पाटील व ग्रामस्थ राजेंद्र घाडगे-पाटील, महेंद्र धमवर, शिवाजी घनवट, अरविंद धनवट, अमर क्षीरसागर, वैशाली पवार, शाखाशिंद, सोनाली पवार, सारिका पवार, आकाश पवार यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.