फलटण आगारातील ४२ मुक्कामी बस फेर्‍या पूर्ववत सुरू कराव्यात

फलटण येथील बाळासाहेबांची शिवसेना संघटनेची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ जून २०२४ | फलटण |
आज सर्व शाळा, कॉलेज सुरू होत असल्याने फलटण आगारातील ४२ मुक्कामी सेवेच्या बस फेर्‍या पूर्ववत सुरू कराव्यात. तसेच या फेर्‍या रविवारी व शनिवारी बंद ठेवू नयेत, अशी मागणी फलटण येथील बाळासाहेबांची शिवसेना संघटनेकडून फलटण आगार व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात संघटनेचे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे जादा तास तसेच रविवारी बाजारासाठी येणार्‍या शेतकर्‍यांची मुक्कामी बससेवा बंद झाल्याने गैरसोय होत आहे. तसेच अनेक भागातील बस बंद असून काही ठिकाणी बससेवा वेळेत पोहोचत नाहीत. महिला कर्मचारी यांना सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंतची सेवा देण्यात यावी. तसेच कर्मचार्‍यांना वेळेत बस उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व सर्व नागरिकांना बससेवा वेळेत उपलब्ध होईल. आगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देऊन प्रवाशांची अडचण दूर करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

निवेदन देताना बाळासाहेबांची शिवसेना संघटनेचे फलटण तालुकाप्रमुख नानासाहेब इवरे, उपतालुकाप्रमुख सुवर्णा कचरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!