हिंगणगांव येथे कृषी दुतांचे आगमन


दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील हिंगणगांव येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण यांचे आगमन झाले आहे. त्यांचा समस्त ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी हिंगणगांवचे सरपंचहेमा भोईटे , उपसरपंच प्रविण भोईटे, तलाठी श्री.नागरवाड , ग्राम सेवक श्री.ऐ.जे .गायकवाड , कृषि सहाय्यक श्री. दिपक नेवसे यांचेसह गावातील असंख्य ग्रामस्थ यावेळी ऊपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक नीलिमा ढालपे, आहेत.

कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत विश्वजीत गिरीगोसावी, दिपक मरकड , ऋषिकेश चव्हाण, भोसले मयुरेश , संकेत दवणे , मंगेश चव्हाण , अभिषेक टेकळे यांनी हिंगणगांव येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे कृषीदूत येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!