
दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज व उद्या ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास फलटण तालुक्यातील कारखान्यांनी प्रतिसाद जर दिला नाही तर आम्हाला वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिलेला आहे.
फलटण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रोखत सर्व कारखान्यांना इशारा दिलेला आहे. आगामी काळामध्ये जर कारखान्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा उत्तर देता येते असे यावेळी यादव यांनी नमूद केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, सचिन खानविलकर यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.